https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

दुर्गेश आखाडे यांच्या श्रीमान कथासंग्रहाचे खा. संजय राऊत यांच्याहस्ते प्रकाशन

0 132

रत्नागिरी दि.१८ : रत्नागिरीतील लेखक दुर्गेश आखाडे यांच्या ‘श्रीमान’ कथासंग्रहाचे प्रकाशन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्याहस्ते मुंबई येथे झाले.’श्रीमान’ कथासंग्रह पुण्याच्या डायमंड पब्लिकेशन्स ने प्रकाशित केला आहे.

दुर्गेश आखाडे यांच्या ‘श्रीमान’ कथासंग्रहाचे प्रकाशन करताना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत


‘श्रीमान’ या कथासंग्रहामध्ये विविध विषयावरील दहा कथा आहेत.या कथासंग्रहातील ‘माझा एल्गार’,’देवदूत’ आणि दगड्या या कथा सत्यघटनेवर आधारित आहेत.’श्रीमान’,’आंधळं प्रेम’,’अपहरण’,’झेंगटे मास्तर’,’जिगर’,’दुरावा’ आणि ‘मॅचविनर’ या कथा काल्पनिक आहेत.याकथासंग्रहाची प्रस्तावना ज्येष्ठ साहित्यिक आनंद म्हसवेकर यांनी लिहिली आहे.कथाचित्र आणि मुखपृष्ठ कविता कुलकर्णी-बंकापुरे यांचे आहे.मलपृष्ठ आदित्य भट याचे आहे.सजावट आणि मांडणी अर्णव प्रिंटर्सची असून मुद्रक ट्रिनीटी ॲकडमी, पुणे आहेत.याकथासंग्रहासाठी देवीलाल इंगळे यांचे सहकार्य लाभले आहे.हा कथासंग्रह दुर्गेश आखाडे यांनी त्यांची आई कै.शांताबाई आखाडे आणि वडील धोंडू आखाडे यांना अर्पण केला आहे.
दुर्गेश आखाडे यांचे हे दुसरे पुस्तक प्रकाशित झाले आहे.यापूर्वी. ‘अधिक अधिक वजा’ हे बालनाट्याचे पुस्तक प्रकाशित झाले होते.हे बालनाट्य व्यवसायिक रंगभूमीवर आले होते.ज्येष्ठ नाटककार कै.प्र.ल.मयेकर यांच्या नाट्यविषयक कारकिर्दीवर आधारित ‘प्र.ल.’ या माहितीपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.’प्र.ल.’ माहितीपट दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून चार वेळा प्रसारित करण्या आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.