उरण (विठ्ठल ममताबादे ): महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचा वाढदिवस विविध ठिकाणी सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
खासदार सुनील तटकरे व मंत्री आदितीताई ठाकरे यांना मानणारा उरण तालुक्यात खूप मोठा वर्ग आहे.उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट )यांच्यातर्फे मंत्री आदितीताई तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उरण तालुक्यातील चिरनेर आश्रमशाळा मध्ये विद्यार्थ्यांना वही पेन या शैक्षणिक साहित्याचे व खाऊवाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे हा कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट )चे उरण तालूकाध्यक्ष परीक्षित ठाकूर,तालुका उपाध्यक्ष दिनेश पाटील,विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, महिला अध्यक्ष कुंदा ठाकूर, युवक अध्यक्ष समद भोंबले,जेष्ठ कार्यकर्ते संतोष ठाकूर, रत्नाकर म्हात्रे, चिरनेर आश्रमशाळाचे मुख्याध्यापक अप्पासाहेब मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी आदितीताई तटकरे यांना वाढदिवसा निमित्त पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.