Ultimate magazine theme for WordPress.

कायाकल्प योजनेमध्ये साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रथम क्रमांक

0 112


रत्नागिरी, दि. १४ : आरोग्य केंद्रांची देखभाल, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, संसर्ग नियंत्रण, सेवा, स्वच्छता प्रचार, रुग्णालयाच्या सीमेपलीकडील कार्य इत्यादी निकषांच्या आधारावर जिल्हा स्तरावरून मूल्यमापन करुन आश्वासन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना कायाकल्प बक्षिस योजनेमध्ये साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रथम क्रमांक प्राप्त झाला. दोन लाखाचे पारितोषिक देऊन त्यांना गौरवण्यात आले, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॕ अनिरुध्द आठल्ये यांनी दिली.


या बक्षिस योजनेमध्ये जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य वर्धिनी उपकेंद्र तसेच जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय यांनी सहभाग घेतला होता.
कायाकल्प बक्षिस योजनेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण ५८ आरोग्य संस्थांनी बक्षिस मिळवले आहे. त्यामध्ये १ उपजिल्हा रुग्णालय, २ ग्रामीण रुग्णालये, २३ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३२ आरोग्य वर्धिनी उपकेंद्र यांचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालय कळंबणी व ग्रामीण रुग्णालय पाली, मंडणगड यांना राज्यातील एकूण उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रोत्साहनपर पारितोषिक प्राप्त झाले आहे. त्यांना प्रत्येकी १ लाख पारीतोषिकांची रक्कम मिळाली आहे.


जिल्हास्तरीय कायाकल्प पुरस्कार प्रथम क्रमांक रक्कम रुपये दोन लाख प्राथमिक आरोग्य केंद्र साखरपा तालुका संगमेश्वर यांना प्राप्त झाले आहे. तसेच प्रोत्साहनपर पुरस्कार रक्कम रुपये पन्नास हजार मिळालेले 22 प्राथमिक आरोग्य केंद्र पुढीलप्रमाणे प्रा. आ. केंद्र कुंबळे तालुका मंडणगड, प्रा. आ. केंद्र पिसई, आसूद, साखरोली तालुका दापोली, प्रा. आ. केंद्र लोटे, तालुका खेड, प्रा. आ. केंद्र कोळवली, तळवली तालुका गुहागर, प्रा. आ. केंद्र कापरे, रामपूर, खरवते, फुरूस, दादर, शिरगांव तालुका चिपळूण, प्रा. आ. केंद्र वांद्री, कडवई तालुका संगमेश्वर, प्रा. आ. केंद्र खान तालुका रत्नागिरी, प्रा. आ. केंद्र साटवली, शिपोशी तालुका लांजा, प्रा.आ. केंद्र धारतळे, ओणी, सोलगाव, जैतापूर तालुका राजापूर यांना प्राप्त झाला.


आरोग्य वर्धिनी उपकेंद्र मधून जिल्हास्तरीय कायाकल्प पुरस्कार प्रथम क्रमांक रक्कम रुपये एक लाख आरोग्य वर्धिनी उपकेंद्र पोचरी तालुका संगमेश्वर यांना प्राप्त झाले आहे, प्रथम रनर अप चे रुपये पन्नास हजाराचे बक्षिस आरोग्य वर्धिनी उपकेंद्र कुडली तालुका गुहागर यांना व द्वितीय रनर अप चे रुपये पस्तीस हजाराचे बक्षिस आरोग्य वधिनी उपकेंद्र पिंपळी खुर्द तालुका चिपळूण यांना प्राप्त झाले, 29 आरोग्य वधिनी उपकेंद्रांना प्रोत्साहनपर रुपये पंचवीस हजाराचे बक्षिस प्राप्त झाले आहे.


आरोग्य वर्धिनी उपकेंद्र आंबडवे, पालवणी, म्हाप्रळ, लाटवण तालुका मंडणगड, आरोग्य वर्धिनी उपकेंद्र खेडों, शिरखळ, पालगड, विसापूर, महामाईनगर तालुका दापोली, आरोग्य वर्धिनी उपकेंद्र मांडवे तालुका खेड, आरोग्य वर्धिनी उपकेंद्र पिपर, पालशेत तालुका गुहागर, आरोग्य वर्धिनी उपकेंद्र निवळी, टेरव, मांडकी, कोळकेवाडी, पेडांबे, दळवटणे, निर्द्धाळ तालुका चिपळूण, आरोग्य वधिनी उपकेंद्र तुळसणी, धामणोबुरंबी, धामापूरवाशी तालुका संगमेश्वर, आरोग्य वर्धिनी उपकेंद्र पूर्णगड तालुका रत्नागिरी, आरोग्य वर्धिनी उपकेंद्र वेरळ, खावडी, विलवडे तालुका लांजा, आरोग्य वर्धिनी उपकेंद्र तळवडे, कोतापूर, गोठणेदोनिवडे तालुका राजापूर यांना प्राप्त झाले आहे.


सर्व कायाकल्प बक्षिस पात्र आरोग्य संस्थांना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय डॉ.बी.व्ही. जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांचेकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.