ग्रुप ग्रामपंचायत जासईकडून घरपट्टी थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरू
उरण दि ३१(विठ्ठल ममताबादे ) : ग्रुप ग्रामपंचायत जासई हद्दीतील यार्ड धारकांच्या घरपट्टी थकबाकी प्रकरणी वसुली जप्ती जप्तीचा भडगाव उभारण्यात आला आहे.
यावेळी आर. के. लॉजिस्टिकस यार्डला टाळे मारून जप्ती करण्यात आली.. जप्तीची कारवाई करताचक्षणी आर. के. लॉजिस्टिक व्यवस्थापनाने ५ लाख रुपयाचा कर ग्रामपंचायतला भरला व उर्वरित कर काही दिवसात ग्रामपंचायतला भरणार असे सांगितले.
यावेळी ग्रुप ग्रामपंचायत जासईचे सरपंच संतोषशेठ घरत,ग्रुप ग्रामपंचायत जासई उपसरपंच श्रीमती माईताई पाटील, ग्रामविकास अधिकारी भास्कर पालकर, ग्रुप ग्रामपंचायत जासईचे सदस्य आदित्य घरत, सुदर्शन पाटील, रामकिशोर ठाकूर, विनायक पाटील, आनंद म्हात्रे ,वीणा घरत ,सुलोचना घरत, आश्विनी नाईक, हर्षदा तांडेल, श्रुष्टी म्हात्रे, जयश्री घरत, प्रतिकक्षा म्हात्रे व नागरिक उपस्थित होते.