- रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीची तत्काळ दखल ; रेल्वे प्रवासी संघटनेने मानले कोकण रेल्वेचे आभार
रत्नागिरी : हिवाळी पर्यटन हंगामासाठी मुंबईतून कोकण रेल्वे मार्गावर चालवण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांना अखेर कोकण रेल्वेने थांबे वाढवले आहेत. या विशेष गाड्यांची घोषणा कोकण रेल्वेने कालच बुधवारी केली आणि कोकणात या गाड्यांना देण्यात आलेल्या अपुऱ्या थांब्यांची बाब कोकण रेल्वे अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने रेल्वेला तत्काळ पत्र पाठऊन निदर्शनास आणून दिली. त्यानुसार कोकण रेल्वेने मुंबई ते करमाळी दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीला आणखीन तीन थांबे दिले आहेत.
आम्ही काल केलेल्या मागणीची तातडीने दखल घेत ०११५१/०११५२ मुंबई-करमळी हिवाळी विशेष गाड्यांना वीर, वैभववाडी रोड आणि सावंतवाडी रोड येथे थांबे दिल्याबद्दल अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्रतर्फे आपले आभार. आम्ही विनंती केल्यानुसार आरक्षण सुरु होण्याआधीच हे वाढीव थांबे दिल्यामुळे संबंधित तालुक्यांतील प्रवाशाना गर्दीच्या हंगामात दिलासा मिळणार आहे.
– अक्षय महापदी, सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र.
याबाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मुंबई ते गोव्यातील करमाळी दरम्यान दररोज चालवण्यात येणाऱ्या विशेष गाडीला रायगड जिल्ह्यात वीर तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी आणि सावंतवाडी स्थानकांवर अतिरिक्त थांबे मंजूर केले आहेत.
कालची मूळ बातमी वाचा इथे : Konkan Railway | हिवाळी स्पेशल गाड्यांना महाराष्ट्रात थांबे देताना रेल्वेचा हात आखडता