Ultimate magazine theme for WordPress.

Konkan Railway | नागपूर-मडगाव विशेष गाडीच्या फेऱ्या सप्टेंबरपर्यंत वाढवल्या

0 483
  • विदर्भ कोकण जोडणारी गाडी धावते आठवड्यातून दोन दिवस

रत्नागिरी : विदर्भातून थेट कोकणात येणाऱ्या नागपूर ते मडगाव या विशेष एक्सप्रेस गाडीच्या फेऱ्या 29 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. सध्या आठवड्यातून दोन दिवस ही गाडी चालवण्यात येते.

नागपूर ते मडगाव या मार्गावर मागील अनेक महिन्यांपासून विशेष गाडी ( 01139 / 01140) चालवण्यात येत आहे. आधी गर्दीच्या हंगामापुरती ही गाडी सुरू करण्यात आली होती. या गाडीला लाभत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन या गाडीच्या फेऱ्यांना वेळोवेळी मदत वाढ देण्यात आली आहे.
आगामी गणेशोत्सव लक्षात घेऊन आता या गाडीच्या फेऱ्यांना पुन्हा 29 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नागपूर मडगाव विशेष गाडी रत्नागिरी येथून मडगावच्या दिशेने रवाना होताना

या आधी जाहीर केल्याप्रमाणे या गाडीचे शेवटची फेरी 30 जून 2024 रोजी होणार होती.
याबाबत कोकण रेल्वे गेलेल्या माहितीनुसार नागपूर ते मडगाव (01139) मार्गावर धावताना ही गाडी दिनांक 28 सप्टेंबर 2024 पर्यंत धावेल तर मडगाव ते नागपूर (01140) दिनांक 29 सप्टेंबर 2024 पर्यंत ही गाडी चालवण्यात येणार आहे.

नागपूर-मडगाव विशेष गाडीचे थांबे

वर्धा, पुळगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थिवी, आणि करमाळी.

Leave A Reply

Your email address will not be published.