Ultimate magazine theme for WordPress.

Konkan Railway | उद्याची मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेस सकाळी ९ वाजता सुटणार!

0 1,937
  • दरड कोसळून वाहतूक विस्कळीत झाल्याचा परिणाम

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर विन्हेरे ते दिवाणखवटी दरम्यान रेल्वे मार्गावर कोसळलेली दरड हटवून रेल्वे वाहतूक सुरू झाली असली तरी या मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत होण्यास काही अवधी जाणार आहे. याच कारणामुळे उद्या मंगळवारी दि.१६ जुलै रोजी मुंबईतून मडगावसाठी सुटणारी तेजस एक्सप्रेस सकाळी ९ वाजता सुटणार आहे.

खेडजवळ कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखवटी रेल्वे बोगद्याजवळ रविवारी सायंकाळी ४ वाजून ४८ मिनिटांनी दरड कोसळून वाहतूक 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. आज सोमवारी सायंकाळी दरड हटवून वाहतूक सुरू झाली आहे. मात्र रविवारच्या या घटनेनंतर अनेकदा विविध ठिकाणी अडकून पडल्यामुळे या मार्गावरील वेळापत्रक सुरळीत होण्यास काही वेळ जाणार आहे.

दिनांक 16 जुलै 2024 रोजी मुंबईतून मडगावसाठी सुटणारी तेजस एक्सप्रेस (22119) ही तिच्या निर्धारित 5.50 यावेळे ऐवजी रिशेड्युल केलेल्या वेळेनुसार सकाळी नऊ वाजता सुटणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.