लांजा : शेतकऱ्यांना सक्षम होण्यासाठी दि प्राईड इंडिया या संस्थेचे कार्य दिशादर्शक आणि कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन लांजा गट विकास अधिकारी श्री. योगेश कदम यांनी लांजा येथे आयोजित कृषी मेळाव्यात केले. दि प्राईड इंडिया आणि एच डी एफ सी बँक यांच्या विद्यमाने लांजा, संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी लक्ष्य कृषी महोत्सव निमित्ताने शुक्रवारी 15 मार्च रोजी लांजा आंग्रे हॉल येथे कृषी प्रदर्शन आणि शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी दि प्राईड इंडिया ची मानद संचालिका श्रीमती ईशा मेहरा, गट विकास अधिकारी योगेश कदम,संतोष मेहत्रे,विकास दांगट,अस्मिता ताटके,शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ चे जिल्हा व्यवस्थापक प्रीती पटेल, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ च्या सोबल सावंत,इंडिया प्राईड चे विरेंद्र कुलकर्णी,वसंत मोरे, सचिन खोत, लांजा संगमेश्वर प्राईड च्या मॅनेजर कामीका नार्वेकर ,फणस प्रगतशील शेतकरी मिथिलेश देसाई, गवाणे काजू प्रकिया सहकारी संस्थेचे जयवंत विचारे,तळवडे माजी सरपंच संजय पाटोळे सह 100 हुन अधिक शेतकरी, बचत गट, कृषी अवजारे पुरवठा दार उपस्थित होते.
दि प्राईड संस्थेने लांजा ,संगमेश्वर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांना एकत्रित करून आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित केले ग्रामीण विकास यंत्रणा मार्फत सुमारे 95 हुन अधिक बचत गट प्राईड ने उभे केले आहेत .38 काजूप्रकिया युनिट बचत गटाच्या मार्फत आहेत भाजीपाला, कडधान्ये, याचे उत्पादन येथील शेतकरी करीत आहेत ही समाधानाची बाब असून शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, अशी ग्वाही प्राईड इंडियाच्या मेहरा यांनी सांगितले