Ultimate magazine theme for WordPress.

रत्नागिरीत १८ जुलैला कॅम्पस इंटरव्ह्यूवप्रमाणे  पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

0 276

रत्नागिरी, दि.१३ : जिल्ह्यातील रोजगार इच्छुक युवक व युवतींकरिता, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 18 जुलै 2024 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे रोड, रत्नागिरी येथे कॅम्पस इन्टरव्ह्यूवप्रमाणे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.

जिल्ह्यातील नामांकित आस्थापनांकडील रिक्त पदांच्या/ॲप्रेंटिसशिप भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे. रोजगार मेळाव्यामध्ये CONNEQT BUSINESS SOLUTIONS, RANDSTAD INDIA LTD, SUMMET FACILITIES LIMITED, USV PRIVATE LIMITED, GADRE MARINE EXPORT PVT. LTD इत्यादी कंपन्यानी पाचशे पेक्षा अधिक रिक्तपदांची मागणी नोंदवलेली आहे. रोजगार मेळाव्यात एस.एस.सी, एच.एस.सी, आय.टी.आय, डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, बी.एस.सी व इतर पदवीधारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने 16 जुलै रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे रोड, रत्नागिरी यांचे सभागृहात सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 यावेळेत मुलाखतीस सामोरे जाण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुलाखत मार्गदर्शन, शिकाऊ उमेदवारी कायदा (Apprenticeship Act) व आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेची माहिती देण्यात येणार आहे. कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल. प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरील Employment- Job Seeker (Find A Job)- Job Seeker Login या क्रमाने जाऊन आपल्याकडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली शैक्षणिक माहिती अद्ययावत करून त्यातील PanditDindayalUpadhyay Job Fair या ऑप्शनमधून आपला जिल्हा निवडून जिल्ह्याच्या नावावरील Vacancy Listing-I Agree व दिसणाऱ्या विविध पदांना आपल्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे ऑनलाईन अप्लाय करावे. ज्या उमेदवारांची नोंद संकेतस्थळावर नाही. अशा उमेदवारांची प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याच्या दिवशी नोंदणी करण्यात येईल त्यासाठी आधारकार्ड व शैक्षणिक पात्रतेची आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत आणावयाची आहेत.

रोजगार मेळाव्यातील रिक्तपदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02352-299385 किंवा द

दीपक लोंढे,वरिष्ठ लिपिक (मो.क्र. 8999089322) या दूरध्वनी क्रमांकावर वर संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.