https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

कोकण रेल्वे मार्गावरील गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण उद्या खुले होणार!

0 6,258

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी सहा विशेष गाड्या दोनच दिवसापूर्वी  जाहीर करण्यात आल्या आहेत. या विशेष गाड्यांचा आरक्षण दिनांक २८ जुलै २०२४ रोजी  ऑनलाइन तसेच रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण खिडक्यांवर एकाच वेळी  सुरू होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच जाहीर केलेल्या विशेष गाड्यांचे आरक्षण खुले होताच काही मिनिटात फुल्ल झाल्यानंतर आता गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या गाड्यांचचा कोकणात गणपतीसाठी कोकणात गावी येणाऱ्या चाकरमान्यांना आधार घ्यावा लागणार आहे.

गुरुवारी रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या गणपती विशेष गाड्यांमध्ये

  • मुंबई सेंट्रल ते ठोकूर साप्ताहिक विशेष
  • मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी रोड आठवड्यातून सहा दिवस
  • बांद्रा ते कुडाळ साप्ताहिक विशेष
  • अहमदाबाद ते कुडाळ साप्ताहिक विशेष
  • विश्वामित्री ते कुडाळ साप्ताहिक स्पेशल फेअर ट्रेन
  • अहमदाबाद ते मंगळूरु साप्ताहिक स्पेशल फेअर ट्रेन

या गाड्यांचा समावेश आहे. या आधी कोकण रेल्वे मध्य रेल्वेच्या सहयोगाने सात विशेष गाड्या जाहीर केल्या. याच बरोबर आता कोकण रेल्वेने पश्चिम रेल्वेच्या सहयोगाने वेगवेगळ्या सहा मार्गांवर गणपती विशेष गाड्या जाहीर केले आहेत.गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या सहा गणपती विशेष गाड्यांपैकी पाच विशेष गाड्यांचे ( 09002, 09010, 09016, 09411 & 09149 ) आरक्षण दिनांक 28 जुलै 2024 रोजी खुले होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.