सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेचा निकाल ३ एप्रिल रोजी
रत्नागिरी : युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2024 ही २री ,३री, ४थी,६वी व ७ वी इयत्तासाठी मराठी व सेमी इंग्रजी माध्यमात घेण्यात आली होती. याचा निकाल 3 एप्रिल रोजी जाहीर होणार आहे.
या परीक्षेत रत्नागिरी जिल्हा गुणवत्ता यादीत प्रत्येक इयत्तेत प्रथम क्रमांकासाठी 2500 रु, द्वितीय क्रमांक 2000 रु, तृतीय क्रमांक 1500 रु, चतुर्थ क्रमांक 1200 रु, पाचवा क्रमांक 1000 रु रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तालुका गुणवत्ता यादीत प्रथम ३ गुणवंत विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच 152 ते 200 गुण असणाऱ्यांना गोल्ड मेडल, 132 ते 150 गुण असणाऱ्यांना सिल्वर, 112 ते 130 गुण असणाऱ्यांना ब्राँझ मेडेल देऊन गौरविण्यात येणार आहे. ३ एप्रिल रोजी आयोजित कार्यक्रमात दुपारी ३:०० वाजता सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेचा online निकाल जाहीर करण्यात येणार आहे. https://bit.ly/sts2024result या लिंक वर बैठक क्रमांक लिहून निकाल पाहता येईल.
उत्तरपत्रिका OMR पद्धतीची असल्याने संगणकाद्वारे तपासली असून निकालादिवशी उत्तरपत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे.
अधिक माहतीसाठी श्रीधर दळवी आणि उमेश केसरकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि संजना सावंत. यांनी केले आहे.