रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या उधना ते मंगळूरु या विशेष रेल्वे गाडीला स्लीपर श्रेणीतील दोन जादा कोच जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.
हिवाळी पर्यटन हंगाम तसेच ख्रिसमसमुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना गर्दी वाढू लागली आहे. नियमित गाड्या तसेच विशेष गाड्यांना अतिरिक्त डबे जोडूनही कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळणे अवघड झाले आहे. प्रवाशांच्या या गर्दीमुळे सुरत जवळील उधना ते कर्नाटकमधील मंगळूर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीला एक स्लीपर तसेच एक थ्री टायर वातानुकूलित डबा अधिकचा जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- हेही वाचा : Konkan Railway | कोकण रेल्वेची २ कोटी ५ लाख ५२ हजारांची दंडवसुली!
- Konkan Railway | दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस उद्यापासून विजेवर धावणार!
- Konkan Railway | ख्रिसमससाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी चार विशेष गाड्या
या संदर्भात कोकण रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार 09057 या उधना ते मंगळूर फेरीसाठी दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी तर मंगळूर ते उधना (09058) फेरी करता दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी स्लीपर श्रेणीचा एक तर वातानुकूलित्री टायर श्रेणीचा एक असे दोन जादा डबे जोडले जाणार आहेत.