उधना ते मंगळूर आणि सुरत ते करमाळीपर्यंत धावणार!
रत्नागिरी : आगामी होळी उत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी दोन गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सुरत जवळील उधना ते मंगळुरू तसेच सुरत ते करमाळी या मार्गावर या विशेष गाड्या धावणार आहेत. या दोन गाड्यांपैकी पहिले विशेष गाडी 20 मार्च 2024 पासून जाणार आहे. या आधी अहमदाबाद ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्या जाहीर झाल्या आहेत.
या संदर्भात रेल्वेकडून प्राप्त माहितीनुसार उधना ते मंगळूर ही आठवड्यातून दोनदा धावणारी गाडी (09057) ही गाडी दिनांक 20 मार्च 2024 व 24 मार्च 2024 रोजी धावणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी (09058) दिनांक 21 व 25 मार्च 2024 रोजी धावणार आहे.
होळीसाठी जाहीर करण्यात आलेली दुसरी विशेष गाडी सुरत ते गोव्यातील करमाळी (09113) स्थानकापर्यंत धावणार आहे. सुरत येथून ही गाडी दिनांक 21 व 28 मार्च 2024 रोजी धावणार आहे तर परतीच्या प्रवासात ही गाडी करमळी येथून (09114) दिनांक 22 वर 29 मार्च 2024 रोजी धावणार आहे.
होळीसाठी कोकणात गावी येणाऱ्या भाविकांना या विशेष गाड्यांमुळे दिलासा मिळाला आहे.