रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे ‘निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी आणि मत्स्य संवर्धन’ या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम दि. १२ ते १४ मार्च, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आला. यावेळी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जीवन सावंत यांनी शिक्षणातील मनाचा उपयोग करून मत्स्य शेतीमध्ये उतरण्याचे आवाहन प्रशिक्षणार्थींना केले.
या कार्यक्रम आयोजन करण्याकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोलीचे सन्माननिय कुलगुरु डॉ. संजय भावे, संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. पराग हळदणकर, आणि संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या प्रशिक्षण कार्यक्रमाकरिता कोकणातील विविध जिल्ह्यातून विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील प्रशिक्षणांर्थीनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचा उद्घाटन कार्यक्रम दि. १२ मार्च, २०२४ रोजी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. सुरेश नाईक यांच्या हस्ते पार पडला. या प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत तीन दिवसात निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी आणि मत्स्य संवर्धन करिता लागणारे तलाव कसे बांधावेत, तलावाची संवर्धनपूर्व तयारी कशी करावी, कोळंबी व मासे यांचे दर्जेदार बीज कसे ओळखावे, बीजाची वहातुक, वन्नामेई कोळंबी संवर्धन, कोळंबी व मासे यांची वाढ कशी मोजावी, कोळंबी व मासे वाढल्यानंतर कसे पकडावे व चांगल्या स्थितीत बाजारात कसे न्यावे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. डॉ. एस. डी. नाईक, डॉ. ए. यु. पागरकर, डॉ. एच. बी. धमगाये, प्रा. एन. डी.चोगले, प्रा. एस. बी. साटम या विषय तज्ञांनी मार्गदर्शन केले.
तसेच बँक ऑफ इंडिया, रत्नागिरीचे कृषि अधिकारी समाधान मोरे यांनी ‘बँकांच्या मत्स्यशेतीकरीता कर्ज योजना’ यावर मार्गदर्शन केले. मत्स्यशेतकरी श्री. रजनीश महागावकर यांनी बायोफ्लॉक तंत्रज्ञानद्वारे निमखारे कोळंबी व मत्स्य संवर्धन यावर स्वअनुभव कथन केले, सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयाने व्यवसाय सुरु करण्यास उपलब्ध असलेल्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध अनुदान योजना यांची माहिती पुरविली, ‘कोळंबी व मत्स्यशेतीचे अर्थशास्त्र व आवश्यक प्रकल्प अहवल बनविणे’ यावर मत्स्यमहाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरीचे विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. के.जे. चौधरी यांनी मार्गदर्शन केले. तर खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल, जि. रायगड येथील विषयतज्ञ डॉ. शशिकांत मेश्राम यांनी ‘खाद्य व्यवस्थापन’ आणि डॉ. विवेक वर्तक यांनी ‘जिताडा मासे संवर्धन’ यावर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी बाणखिंड, शिरगाव येथे असलेल्या आदिष्टी अॅक्वा फार्म वर प्रशिक्षणार्थीची प्रकल्प भेट आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रशिक्षणार्थींना प्रत्यक्ष प्रकल्प आणि प्रात्याक्षिके अनुभविता आलेत. या मिळालेल्या संधीबद्दल प्रशिक्षनार्थिनी प्रकल्पाचे मालक श्री. वैभव खेडेकर आणि श्री. सुदेश मयेकर तसेच प्रकल्प व्यवस्थापक यांचे मनपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमाचा समारोप समारंभ दि. १४ मार्च २०२४ रोजी पार पडला. यावेळी श्री. जीवन सावंत, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रत्नागिरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यां नी आपल्या भाषणामध्ये ‘निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन बहुतेक प्रशिक्षनार्थिनी निर्णय घेतला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि या प्रशिक्षणामध्ये मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून यश प्राप्त करण्याचे आववाहन केले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. सुरेश नाईक उपस्थित होते. यावेळी डॉ. नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्रशिक्षणांर्थीनी आम्ही दिलेल्या प्रमाणपत्राच्या उपयोग शासकीय योजनांकरीता करावा, तसेच दिलेल्या ज्ञानाच्या उपयोग करून यशस्वी उद्योजक होण्याकरिता शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थीना यशस्वी सहभाग बद्दल प्रमाणपत्र आणि प्रशिक्षण पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे डॉ. आसिफ पागरकर आणि प्रा. सचिन साटम हेही उपस्थित होते.
प्रशिक्षणार्थीनी मान्यवरांना आपली ओळख आणि अनुभव कथन करताना प्रशिक्षण कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केल्याबद्दल संशोधन केंद्राचे आभार व्यक्त केले. प्रशिक्षणांर्थी श्री. ओमकार बामणे (आडिवरे) यांनी आपल्या मनोगतामध्ये हा प्रशिक्षणा मध्ये आम्हाला प्रत्यक्ष मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग पुढील आयुष्यात व्यवसायामध्ये करण्याचा मानस व्यक्त केला. श्री. महमद पाते (चिपळूण) यांनी प्रशिक्षण्याचे उतम नियोजना बद्दल आभार व्यक्त केले. प्रशिक्षणार्थी श्री. पंडरीनाथ बांदेकर (देवगड, सिंधुदुर्ग) यांनी आपण खोल समुद्रात मासेमारी करीत असून आता उत्पन्नाचे प्रमाण कमी झाल्याने मासेमारीकडून मत्स्य संवर्धन कडे वळताना या प्रशिक्षणाचा नक्कीच उपयोग होईल असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. आसिफ पागरकर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रशिक्षण कार्यक्रम समन्वयक प्रा. सचिन साटम यांनी केले.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे डॉ. आसिफ पागरकर, डॉ. हरीश धमगाये, प्रा. नरेन्द्र चोगले, प्रा. सचिन साटम यांनी मेहनत घेतली. तसेच श्री. रमेश सावर्डेकर, श्रीमती जाई साळवी, श्री. मंगेश नांदगावकर, श्री. महेश किल्लेकर, श्री. दिनेश कुबल, श्री. सचिन पावसकर, श्री. मनिष शिंदे, श्री. मुकुंद देवूरकर, श्री. सुहास कांबळे, श्री. सचिन चव्हाण, श्री. विवेक धुमाळ, श्री. प्रविण गायकवाड तसेच मजूर श्री. स्वप्नील आलीम, श्री. तेजस जोशी, श्री. अभिजित मयेकर, श्री. उल्हास पेडणेकर, श्री. योगेश पिलणकर आणि श्री दर्शन शिंदे यांनी मेहनत घेतली.