लांजातील ज्येष्ठ साहित्यिक गजाभाऊ वाघदरे यांचे निधन
लांजा : लांजा शहरातील ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, सामाजिक नेता गजानन शंकर वाघदरे (गजाभाऊ ) यांचे आज ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
एक जाणकार सामाजिक नेता, गजानन शंकर वाघधरेज्येष्ठ साहित्यिक आणि खंबीर नेता असलेले व्यक्तिमत्व हरपलल्याची प्रतिक्रिया लांजातील ज्येष्ठ नेते नाना मानकर यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर दिली आहे.
मुंबई येथून ते लांजा या गावात वास्तव्याला होते काही काळ प्रभानवल्ली गावी शिक्षक होते. लांजा हायस्कूलमध्ये त्यांनी लिपिक पदाची नोकरी केली राजीनामा देऊन त्यांनी सामाजिक चळवळीचा भाग होण्यासाठी सक्रिय झाले. ज्येष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत प्रा. मधु दंडवते यांचे सहकारी होते. काही काळ सरकारी नोकरी करून त्यांनी लांजा गावात गावच्या विकासासाठी सहभाग घेतला होता. काही वर्षे ते लांजा ग्रामपंचायतचे सदस्यही होते. त्यांचा प्रिंटिंग व्यवसाय होता.
साप्ताहिक सुरू करून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्न समस्या यावर परखड विचार व्यक्त केले होते. लांजा गावची नळपाणी योजना अमलात आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. न्यू एज्युकेशन सोसायटी लांजे
लोकमान्य वाचनालय व लांजे महिलाश्रम या सामाजिक संस्था, लांजा पंचक्रोशी विकास सोसायटी
गृहतारण सोसायटी या संस्थांमध्ये त्यांनी काम केले. जनता सहकारी पतसंस्था उभारणीत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. ग्रामपंचायत लांजा १० वर्षे सदस्य लांजा शहराच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे जनक होते साहित्य क्षेत्रातील ते कवी कथाकार होते. त्यांच्या काही कादंबऱ्या गाजल्या आहेत. वास्तववादी ही कादंबरी त्यांनी लिहिली होती.
त्यांच्या मागे पत्नी विवाहित दोन मुलगे, विवाहित मुलगी, नातवंडे सुना असा मोठा परिवार आहे समाजवादी चळवळीचे ते सक्रिय कार्यकर्ते होते.