https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आदींचे उमेदवारी अर्ज दाखल

0 64

 

मुंबई : कामठी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी – महायुतीचे उमेदवार म्हणून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुलेखा कुंभारे उपस्थित होत्या. अर्ज दाखल करण्यापूर्वी निघालेल्या मिरवणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती घटक पक्षातील सर्व महत्वाच्या नेत्यांसह विशाल जनसमुदाय उपस्थित होता.

डोंबिवली मतदारसंघातील भाजपा उमेदवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी श्री. चव्हाण यांनी डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश आणि विविध देवस्थानांचे दर्शन घेतल्यानंतर काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, आ. किसन कथोरे आदी सहभागी झाले होते.

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा उमेदवार देवयानी फरांदे, नाशिक पश्चिम मतदारसंघातील सीमाताई हिरे, नाशिक पूर्व मतदार संघातील राहुल ढिकले यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे तसेच महायुतीच्या घटक पक्षाचे नेते उपस्थित होते.

यवतमाळ मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मदन येरावार यांनी मंगळवारी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुती समन्वयक डॉ. प्रवीण प्रजापती, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा महामंत्री राजू पडगीलवार आणि महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घाटकोपर मतदार संघातील भाजपा उमेदवार पराग शहा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार मनोज कोटक, माजी नगरसेवक परमेश्वर कदम आणि माजी नगरसेविका रितू तावडे आदी उपस्थित होते.

बोरीवली मतदारसंघातील भाजपा उमेदवार संजय उपाध्याय यांनी भव्य मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, आ. सुनील राणे, मनीषा चौधरी, अतुल भातखळकर, योगेश सागर, शिवसेनेचे आ. प्रकाश सुर्वे, भाजपा उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.