Ultimate magazine theme for WordPress.

होळीसाठी कोकण मार्गावर उरणमधून बसेस सोडण्याची मागणी

0 1,029

कोकणवासीय उत्कर्ष संस्थेकडून निवेदन सादर

उरण दि. २ (विठ्ठल ममताबादे ) : हिंदूंच्या अनेक महत्वाच्या सणापैकी होळी हा एक महत्वाचा सण असून कोकण विभागात खेडोपाडी गावोगावी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबई नवी मुंबई आदी ठिकाणी काम करत असलेले नोकरदार कामगार वर्ग, चाकरमानी होळी सण मोठया उत्साहात साजरे करण्यासाठी आपल्या गावी कोकणात जात असतात. कोकणात होळी सणासाठी प्रवास करताना कोकणी माणसाला, नागरिकांना कोणत्याही अडचणी येऊ नये,कोकणी माणसाचा प्रवास सुखाचा आनंदाचा सुलभ व्हावा या दुष्टीकोनातून दरवर्षी कोकणवासीय उत्कर्ष संस्था (उरण) च्या पाठपुराव्याने उरण बस आगारातून कोकणात जाण्यासाठी व उरण मध्ये परत येण्यासाठी ज्यादा बसेस सोडल्या जातात.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कोकणवासीय उत्कर्ष संस्था (उरण)तर्फे उरण बस आगारातून कोकणात जाण्यासाठी ज्यादा बसेस सोडण्यात यावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे.सदर ज्यादा बसेस सोडण्यासाठी संस्थेचे सचिव रविंद्र चव्हाण यांनी उरण बस आगार तसेच मुख्य कार्यालय असलेल्या मुंबई कार्यालय मध्येही पत्रव्यवहार केलेला आहे. उरण ते रत्नागिरी, उरण ते खेड, उरण ते देवरुख, उरण ते कणकवली, उरण ते गणपतीपुळे या मार्गावर ज्यादा बसेस सोडण्याची मागणी कोकण वासीय उत्कर्ष संस्था उरण तर्फे उरण बस आगार व्यवस्थापक सतीश मालचे यांना करण्यात आली आहे.

आगाराचे व्यवस्थापक सतीश मालचे यांनी या पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.