Ultimate magazine theme for WordPress.

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांनतर्फे गोरेगावला महिला, हॉस्पिटल, शाळांना वस्तूभेट

0 363
  • पादुका दर्शन सोहळा उत्साहात

मुंबई, दि. ४: गोरेगाव (मुंबई) पश्चिम येथील लक्ष्मी सरस्वती मैदानावर जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा गुरुवारी संपन्न झाला. सोहळ्यास हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी संस्थानच्या सामाजिक उपक्रमांतर्गत महिलांना घरघंटीचे, हॉस्पिटल शाळांना अत्यावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. 

गिरगाव येथील जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळ्यात गुरुवारी महिलांना घरघंट्याचे वाटप करताना मान्यवर.
सोहळ्यास गुरुवारी मोठ्या संख्येने उपस्थित भाविक.

या मैदानावर सकाळपासून भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. येथे भव्य मंडप व संतपीठाची उभारणी करण्यात आली होती. जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका मिवणुकीने पालखीतून आणण्यात आल्या. संतपीठावरील उच्चासनावर त्या ठेवण्यात आल्या. विधिवत पूजा, आरती झाली. त्यानंतर दर्शन सोहळा सुरू झाला. अनेक  नामवंतांनी पादुका दर्शनासाठी हजेरी लावली. त्यांच्या हस्ते संस्थानच्या सामाजिक उपक्रमांतर्गत  गरजू व्यक्ती, संस्थांना विविध उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान सामाजिक  उपक्रमाच्या अनुषंगाने आणि मुंबई उपपीठाच्या अंतर्गत मुंबईमधील वेगवेगळ्या भागातील गरीब आणि गरजू महिलांना१३ घरघंट्याचे वाटप करण्यात आले.

तसेच शाळा आणि हॉस्पिटल यांना त्यांच्या मागणीनुसार पुढील शालोपयोगी आणि हॉस्पिटल निगडीत पुढील वस्तूंचे वाटप करन्यात आले.

१)संस्कार धाम विद्यालय गोरेगाव पश्चिम :- एक वॉटर प्युरिफायर. २) प्रबोधन विद्या निकेतन मालाड पश्चिम:- प्रिंटर आणि स्कॅनर. ३) निवारा विद्यालय गोरेगाव पूर्व:- दोन वॉटर प्युरिफायर्स आणि प्रोजेक्टर विथ स्क्रीन. ४) विद्या विकास मंदिर गोरेगाव पश्चिम:-दोन वॉटर प्युरिफायर्स. ५) ज्ञानसागर विद्यालय जोगेश्वरी पश्चिम:- कॉम्प्युटर. ६) हिंदुहृदय  सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा  केअर हॉस्पिटल जोगेश्वरी पूर्व येथे  बीपीएल ईसीजी मशीन. ७) गरजू महिलांना उदरनिर्वासाठी १३ घरघंट्याचे  (पिठाची चक्की) वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला भाविकांची मोठी गर्दी होती. श्री पादुकांचे दर्शन सर्वांनी रांगेने घेतले. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय उत्साहात व शांततेने सोहळा झाला. संस्थानच्या मुंबई उपपीठाने त्याचे नियोजन केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.