Ultimate magazine theme for WordPress.

मुझम्मील काझी यांची गाव विकास समितीच्या प्रमुख प्रवक्तेपदी निवड

0 27

रत्नागिरी : गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मील काझी यांची गाव विकास समितीच्या प्रमुख प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे.संघटनेच्या कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली आहे.

मुझम्मील काझी यांचा स्पष्ट वक्तेपणा,सामाजिक कार्य,त्याच बरोबर जनसंपर्क बघून संघटनेचे अध्यक्ष उदय गोताड यांनी ही निवड केली आहे.

मुझम्मील काझी यांची प्रमुख प्रवक्ते पदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र अध्यक्ष उदय गोताड यांनी देवरूख येथे झालेल्या बैठकीत दिले. यावेळी संघटन प्रमुख सुहास खंडागळे, उपाध्यक्ष राहूल यादव, मंगेश धावडे, सरचिटणीस डॉ. मंगेश कांगणे,सुरेंद्र काब्दुले, जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर, जिल्हा संघटक मनोज घुग, संगमेश्वर तालुका सरचिटणीस दैवत पवार, संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष प्रशांत घुग,सदस्य नितीन गोताड, महिला संघटना अध्यक्षा दिक्षा खंडागळे, उपाध्यक्षा अनघा कांगणे,सरचिटणीस उजमा मापारी – खान इत्यादी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.