सावर्डे येथील जिल्हास्तरीय नमन स्पर्धेत गोळवलीचे हौशी नमन मंडळ प्रथम
रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांस्कृतिक विभाग व राधा गोविंदा फाउंडेशन यांच्यावतीने चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार शेखर निकम यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक जिल्हास्तरीय भव्य नमन स्पर्धा म्हणजेच उत्सव लोककलेचा, लोक परंपरेचा हा कार्यक्रम सावर्डे तालुका चिपळूण सह्याद्री क्रीडा संकुल आयोजित करण्यात आला होता. कोकणच्या पारंपारिक लोककलेचा स्तर, दर्जा सुधारून उंचावण्यासाठी तसेच लोककलावंतांना प्रोत्साहित करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
ही स्पर्धा दि. ११ मार्च ते १२ मार्च२०२४ या कालावधीत घेण्यात आल्या. नमन स्पर्धामध्ये हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली ता .संगमेश्वर यांनी प्रथम क्रमांक पटकवला. या नमन मंडळीने कोकणातील लोककला जतन करून व या लोककलेचा स्तर उंचावण्याचा ध्यास घेतला आहे. आत्तापर्यंत त्यांचे सुमारे ४०ते ५० प्रयोग संपन्न झाले आहेत. हौशी या शब्दाप्रमाणे दिवसाचे नोकरी धंदा करून रात्री या कलेसाठी वेळ देवून आपली व लोककला जपण्याची हौस पूर्ण करताना दिसतात.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून अनुभवी व जाणकार संतोष कुळें, प्रदीप मोहिते, चंद्रकांत पालकर, शेखर मुळ्ये इत्यादींनी काम पाहिले.
जिल्हास्तरीय नमन स्पर्धेचा निकाल याप्रमाणे
प्रथम क्रमांक : हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली
बक्षिस ५०हजार रुपये व आकर्षक चषक
द्वितीय क्रमांक: रवळनाथ रिमिक्स रत्नागिरी
बक्षीसे ३५ हजार रुपये व आकर्षक चषक
तृतीय क्रमांक : ए वन केदारनाथ सावर्डे
बक्षीस २१ हजार रुपये व आकर्षक चषक
उत्तेजनार्थ : भैरवनाथ नमन मंडळ रानपाट
तसेच उत्कृष्ट स्त्रीपात्र (अभिनय) हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली. उत्कृष्ट मावशी अभिनय, सतिश किंजळकर यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
तसेच आकर्षक वैयक्तिक बक्षिसे सर्वोत्कृष्ट गायन, वादक, लक्षवेधी सादरीकरण, सर्वोत्कृष्ट गवळण, सर्वोत्कृष्ट गण, सर्वोत्कृष्ट मावशी अशा प्रकारची बक्षीसे ठेवण्यात आली होती.
सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार शेखर निकम उद्योजक किरण सामंत माजी सभापती पूजा निकम सचिन पाकळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच हास्य जत्रा मराठी अभिनेते प्रभाकर मोरे व इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस समारंभ संपन्न झाला.
प्रथम क्रमांक पटकवलेल्या हौशी कलाकार मंडळींच्या मिरवणुकिचे स्वागत व अभिनंदन गोळवली गावचे गावकर बुधाजी दुदम, शंकर दुदम, दत्ताराम दुदम व गावातील ग्रामस्थ तसेच जि. प. मा. उपाध्यक्ष संतोष थेराडे यांच्यासह विजय कुवळेकर,कडवई सरपंचा विशाखा कुवळेकर, दत्ता लाखण आदी मंडळींनी केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.