https://digikokan.com
Ultimate magazine theme for WordPress.

Vande Bharat Express | वंदे भारत एक्सप्रेसची लोकप्रियता प्रचंड वाढली!

0 217

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ३० डिसेंबर 2023 रोजी अयोध्या धाम जंक्शन येथून सहा विविध मार्गांवरील वंदे भरत एक्सप्रेससह वंदे भारत एक्सप्रेसच्या साधारण श्रेणीमधील सर्वसामान्यांना परवडतील, असे तिकीट असलेल्या दोन अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसची लोकप्रियता सतत वाढतच असल्याचे लक्षात येत आहे. भारतात वंदे भारत एक्सप्रेसला मिळत असलेल्या प्रतिसाद पाहून ही गाडी त्यांच्या देशात नेण्याबाबत विदेशातूनही विचारणा होऊ लागली आहे. वंदे भारत एक्सप्रेस साकारलेल्या अभियंत्यांचे हे मोठे यश मानले जात आहे.

पर्यटकप्रिय बनली वंदे भारत एक्सप्रेस!

‘मेक इन इंडिया’च्या अंतर्गत चेन्नई येथील इंटिग्रेटेड कोच फॅक्टरीत (ICF) तयार झालेल्या वंदे भारती एक्सप्रेसला देशभरात जवळपास 40 मार्गांवर अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दिनांक 27 जून 2023 रोजी मुंबई ते गोवा दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ला देखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मुंबई सीएसएमटी ते मडगाव मार्गावर धावणाऱ्या गाडीला शंभर टक्के किंवा त्यापेक्षा अधिक काही प्रतिसाद मिळत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या या गाडीला पर्यटकांकडून अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे.

स्वागतासाठी सेल्फीच सेल्फी कथ्थकही!

30 डिसेंबर रोजी सुरू झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मंगळूर ते मडगाव एक्सप्रेसचा समावेश आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणारी ही दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरली आहे. एकाच वेळी सहा वंदे भारत एक्सप्रेस तसेच दोन अमृत भारत श्रेणीतील गाड्या सुरू झाल्याने वंदे भारत श्रेणीमधील गाड्यांची क्रेझ वाढल्याचे लक्षात येते आहे. या गाडीच्या शुभारंभ प्रसंगी गाडीसोबत सेल्फी तसेच पारंपरिक नृत्यासह स्वागत केले जात आहे. मंगळुरू ते मडगाव दरम्यान 30 डिसेंबर रोजी शुभारंभ झालेल्या गाडीसोबत अनेक कलाकारांनी केवळ सेल्फी न घेता आपली अदाकारीही सादर केली.

दिनांक ३० डिसेंबर २०२३, रोजी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले.

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकावरून २ अमृत भारत एक्सप्रेस आणि ६ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.

मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे स्वागत करण्यात आले.

जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन मध्य रेल्वेच्या स्थानकांवर भव्य स्वागत करण्यात आले.

पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी दि. ३० डिसेंबर २०२३ रोजी पुनर्विकसित अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले.

पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी दि. ३०.१२.२०२३ रोजी अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकावरून वेगवेगळ्या शहरांदरम्यान २ अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.
तपशील खालीलप्रमाणे:-

१. दरभंगा – अयोध्या – दिल्ली (आनंद विहार टर्मिनल) अमृत भारत एक्सप्रेस
२. मालदा टाउन – बंगळुरू छावणी अमृत भारत एक्सप्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. ३०.१२.२०२३ रोजी अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकावरून विविध शहरांदरम्यानच्या ६ वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.
तपशील खालीलप्रमाणे:-

१. श्री माता वैष्णो देवी कटरा – नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस
२. अमृतसर – दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस
३. कोईम्बतूर – बंगळुरू छावणी वंदे भारत एक्सप्रेस
४. मंगळुरु – मडगाव (गोवा) वंदे भारत एक्सप्रेस
५. अयोध्या धाम-आनंद विहार टर्मिनल (दिल्ली) वंदे भारत एक्सप्रेस
६. जालना – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस

महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री रमेश बैस आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रमात सामील झाले.

दि. ३०.१२.२०२३ रोजी जालना – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाचे मध्य रेल्वेच्या मनमाड जंक्शन, नाशिक रोड, कल्याण जंक्शन, ठाणे, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अशा विविध स्थानकांवर खासदार, आमदार, पालकमंत्री, शालेय विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांच्या उपस्थितीत भव्य स्वागत करण्यात आले.

ही वंदे भारत एक्सप्रेस सेवा मध्य रेल्वेसाठी ६वी आणि महाराष्ट्र राज्याची सातव्या क्रमांकाची सेवा आहे.

वंदे भारत ट्रेनचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे जल्लोषात आणि थाटामाटात स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्री राहुल शेवाळे, विधानसभा सदस्या श्रीमती यामिनी जाधव आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत समारंभ संपन्न झाला. मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक श्री चित्तरंजन स्वैन यांनी स्वागत भाषण केले तर मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री रजनीश गोयल यांनी आभार मानले.

दादर येथे विधानसभेचे सदस्य श्री कालिदास कोळंबर हे स्वागत समारंभास उपस्थित होते.

ठाणे येथे खासदार राजन विचारे आणि विधानसभा सदस्य संजय केळकर हे स्वागत समारंभास उपस्थित होते.

नाशिकरोड येथे विधानसभा सदस्या (नाशिक पश्चिम), श्रीमती सीमा महेश हिरे आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ विभाग श्रीमती. इती पांडे यांच्या उपस्थितीत स्वागत समारंभाला करण्यात आला.

मनमाड जंक्शन येथे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार या ऑनलाइन पद्धतीने स्वागत समारंभात सहभागी झाल्या. यावेळी विधानपरिषद सदस्य श्री नरेंद्र दराडे आणि भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापिका श्रीमती. इति पांडे.

जालना-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस:-

जालना – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसची नियमित सेवा सुरू होणार आहे. दि. ०१.०१.२०२४ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि दि. ०२.०१.२०२४ पासून जालना येथून.

जालन्याहून मुंबईत दाखल झालेलल्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचा उत्साह ओसंडून वाहत होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभारंभाच्या या गाडीतून प्रवास केलेल्यांचे स्वागत केले

जालना – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत.

गाडी क्रमांक २०७०६ मुंबई – जालना वंदे भारत एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दररोज (बुधवार वगळता) १३.१० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०.३० वाजता जालना येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक २०७०५ जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस जालना, दररोज (बुधवार वगळता) ०५.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ११.५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड आणि औरंगाबाद.

संरचना: १ वातानुकूलित एक्झिक्युटिव्ह श्रेणी आणि 7 वातानुकूलित चेअर कार.

 

Leave A Reply

Your email address will not be published.