शृंगारपूरच्या भाविकांना घेऊन विनोद म्हस्के पंढरपुरात!
कार्तिकी वारीसाठी ४० भाविकांचा विठ्ठलनामाचा गजर!
संगमेश्वर : कार्तिक एकादशी वारीनिमित्त १८ नोव्हेंबर रोजी शृंगारपूर येथून ४० वारकऱ्यांची एक बस विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरकडे रवाना झाली आहे.
गतवर्षी प्रमाणे यावर्षी देखील युवा उद्योजक भाजप उत्तर संगमेश्वर मंडल अध्यक्ष विनोद म्हस्के यांनी वारकऱ्यांसाठी स्वखर्चाने बस उपलब्ध करुन दिली आहे. म्हस्के यांच्या सोबत किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संजय सुर्वे, कारभाटले गावचे सरपंच दिनेश मालप , शृंगारपूर मधून गजानन म्हस्के, दीपक म्हस्के, प्रमोद साळुंके आणि गावातील ४० भाविकांचा समावेश आहे. मुंबई येथील शृंगारपूरस्थित चाकरमानी यांनी या सर्व भाविकांची ५ दिवस निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली आहे. कार्तिकवारी घडविल्याबद्दल भाविकांनी विनोद म्हस्के यांच्यासह मुंबईकर चाकरमान्यांना धन्यवाद दिले आहेत.