उरण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतली शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट
उरण दि ३१(विठ्ठल ममताबादे ) पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोगभाऊ वाघेरे पाटील यांनी हजारो कार्यकर्त्यांसह मातोश्री,मुबंई येथे जाऊन माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना (ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला, यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या उरण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी यांनी पक्षप्रमुख श्री उद्धवसाहेब ठाकरे यांची रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील व रायगड जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सदिच्छा भेट घेतली.
यामध्ये उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, उपतालुकाप्रमुख कमलाकर पाटील, युवासेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत व पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.